15 एप्रिलपर्यंत व्हिसावर बंदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
परदेशातून भारतात आलेल्या बहुतांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता 15 एप्रिलपर्यंत पर्यटक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70च्या वर पोहोचली आहे. यामध्ये 17 परदेशी रुग्णांचाही समावेश आहे. सध्या देशातील 12 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशात सर्वाधिक करोनाबाधित केरळ राज्यात आढळले आहेत. तेथे 17 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. केरळपाठोपाठ महाराष्ट्रात 11, उत्तर प्रदेशात 10, तर दिल्लीत सहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने काही पावले उचलली आहेत. यात परदेशी नागरिकांच्या व्हिसावर मर्यादा घालण्यात आली आहे.