Breaking News

उरणमध्ये आठ मोटरसायकली जाळल्या

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील उरण-मोरा रोडवरील भवरा येथील मांगीर देव झोपडपट्टीजवळ असलेल्या मोटरसायकल जाळण्याची घटना सोमवारी रात्री घडली. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असून त्याच्या विरोधात मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. 16) मध्यरात्री ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने भावाराक येथे उभ्या असलेल्या मोटरसायकलींना आग लावली. या आगीत एक-एक करून आठ मोटरसायकली जळून खाक झाल्या. आगीत जळालेल्या गाड्यांची अंदाजे किंमत एक लाख 62 हजार आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. ए. देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply