Breaking News

वाढीव वीजबिलावरुन शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील वीजबिलावरुन विरोधकांचे लक्ष्य ठरलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांनीच टीका केली आहे. मराठा तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री नितीन राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेळ आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

याबाबत नरेंद्र पाटील म्हणाले की, 2019 ला मराठा समाजातील बर्‍याच तरूणांनी महावितरणाच्या वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा दिल्या. त्यामध्ये एसईबीसी कोट्यातून मराठा तरूण पासही झाले, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे वारंवार आम्ही एसईबीसीमधून उत्तीर्ण झालेल्या मराठा तरुणांना कामावर ठेऊ असं सांगत आहेत, पण महावितरणाचे महाव्यवस्थापक संचालक असीम गुप्ता यांनी एका परिपत्रकात सांगितलं आहे की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून सध्या वीज वितरण कंपनीत एसईबीसीच्या उत्तीर्ण मुलांना कामावर ठेवता येणार नाही असे म्हंटले, मग राज्याचे ऊर्जामंत्री मराठा तरुणांची दिशाभूल का करत आहे हे कळत नाही असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक असल्याने लोकांना चांगले काम करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न करतायेत, मात्र हे खोटे बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जातीने या गोष्टीत लक्ष घालावे, मराठा तरूणांची थट्टा करू नये, एकीकडे राज्यातील वीजग्राहकांची थट्टा सुरु आहे, 100 युनिटपर्यंत वीजबिल माफ करु असे सांगितले, तेही करत नाही अशी टीका करत नितीन राऊत यांनी एसईबीसी तरुणांना कामावर घेणार या विधानाची तपासणी करावी, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply