Breaking News

राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 20वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निर्मिती व्हावी यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने गेल्या 19 वर्षांपासून राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास 75 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 35 हजार, तर तृतीय क्रमांकास 20 हजार रुपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कथेसाठी सात हजार रुपये, उत्कृष्ट कविता व उत्कृष्ट व्यंगचित्रास प्रत्येकी 2500 रुपये, उत्कृष्ट विशेषांकास पाच हजार रुपये, बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास 7500 रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांसाठीही खास पारितोषिके देण्यात येणार असून, यामध्ये प्रथम क्रमांकास 30 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 15 हजार रुपये, तृतीय क्रमाकांस सात हजार 500 रुपये, दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी तीन हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती 100 रुपये प्रवेश फीसह 31 डिसेंबरपर्यंत पाठवाव्यात. दिवाळी अंक पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट क्रमांक 475, मार्केट यार्ड, पनवेल, जि. रायगड (मो. क्रमांक 9769409161) येथे संपर्क साधावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply