Breaking News

नियमांचे पालन न करणार्या 11,780 जणांवर कारवाई

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईत मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे असूनही पालन होताना दिसत नाही. आतापर्यंत अशा 11 हजार 780 जणांवर कारवाई करण्यात आली असून 61 लाख 33 हजार 750 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांना समज मिळावी ही या कारवाईची भूमिका असली तरी अद्याप नियमांचे पालन होताना दिसत नाही. आठही विभाग कार्यालयांत नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाईसाठी स्वतंत्र विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

विभाग कार्यालयांतील दक्षता पथकाबरोबर आठ विभाग कार्यालयनिहाय आठ विशेष भरारी पथके कारवाई करीत आहेत.

या पथकात पालिकेच्या दोन कर्मचार्‍यांसह दोन पोलीसही आहेत. आतापर्यंत 11 हजार 780 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात बेलापूर विभागात 2129 जणांवर शहरात सर्वाधिक कारवाई झाली आहे. दिघामध्ये सर्वात कमी 763 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुखपट्टी न वापरणार्‍या 6,255 जणांवर कारवाई करून 31 लाख 34 हजार 100 रुपये दंडवसुली तर सामाजिक अंतर न पाळणार्‍या 848 दुकाने आणि 4553 नागरिकांवर कारवाई करीत 20 लाख 13 हजार 200 रुपये, तर रस्त्यावर थुंकणार्‍या 32 जणांवर कारवाई करून 30 हजार 450 रुपये दंड वसूल केला आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply