पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी जयंत्तीच्या कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवारी (दि. 19) करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. पनवेलमध्ये टपाल नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामोठे तसेच ठिकठिकाणी शिवजयंत्तीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक नितीन पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका चारुशीला घरत, रूचिता लोंढे, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, के. के. म्हात्रे, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप सरचिटणीस सुशील शर्मा, भाऊ भगत, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, नाना मगदूम, जयश्री धापते, वैशाली जगदाळे, मनीषा वणवे, ललिता इनकर, सुरेखा लांडे, कल्पना जाधव, प्रवीण कोरडे, सुरेंद्र हल्लीकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरांना आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.