Breaking News

देशात कोरोनाचा हाहाकार!

सलग तिसर्‍या दिवशी तीन लाखांचा टप्पा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि. 23) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (24 दि. 24) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहचला आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिल्लीच्या तीन महानगरपालिकांने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत तब्बल 1,057 लोकांचे अंत्यसंस्कार करण्यात आले असून हे अत्यंत भयानक आहे. तीन महानगरपालिकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत 18 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान दररोज अंदाजे 352 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत असतानच या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील विदिशा मेडिकल कॉलेजमधील हलगर्जीपणाची आणखी एक घटना समोर आली आहे. शव घेऊन जाणार्‍या वाहनातून कोरोनाग्रस्ताचा मृतदेह हा भर रस्त्यात पडला. लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी मोठमोठ्याने आवाज देऊन वाहन थांबवलं. त्यानंतर तो पुन्हा उचलून वाहनात ठेवण्यात आला आणि अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply