पनवेल : महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 आणि 19मधील स्वच्छतागृहांची सभागृह नेते परेश ठाकूर व सहकार्यांनी शुक्रवारी पाहणी करून आढावा घेतला. या पाहणी दौर्यात नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय सेमळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, परमेश्वर गिरे, अजिंक्य जाधव यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते. पाहणीदरम्यान सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांना स्वच्छतेसंदर्भात सूचना दिल्या. (छाया : लक्ष्मण ठाकूर)




