पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग; मान्यवरांकडून मार्गदर्शन
उरण : वार्ताहर
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्यावातीने मंडल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग 28 आणि 29 नोव्हेबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उरण मंडलसाठी आयोजित वर्गाचे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनंद पटवर्धन यांच्याहस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले असून, या शिबिराचा रविवारी (दि. 29) समारोप उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्यावतीने दर तीन वर्षांनी हे वर्ग अयाोजीत केले जात असून, एकूण वेगवेगळ्या दहा विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी 2 दिवस प्रक्षिशन वर्गाचे आयोजन केले आहे. त्यानुसार द्रोणागिरी येथील भागुबाई चांगू ठाकूर विद्यायात उरण मंडलाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरात उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माधव घांगुर्डे, राम भोजने, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, दीपक बेहेरे, अनिल ढुमणे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, सुशिल शर्मा यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे औच्यित्यसाधून उरण तालुक्यातील विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्यांना पदाधिकार्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या शिबिराला जिल्हा सरचिटणीस नंदु पटवर्धन, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घरत, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, कामगार नेते सुरेश पाटील, रायगड जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष जितेंद्र घरत युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस शेखर तांडेल, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, उपाध्यक्ष निर्मला घरत, शहर अध्यक्षा संपूर्णा थळी, तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील ठाकूर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, सरचिटणीस दिपक भोईर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, नगरसेविका जानव्ही पंडीत, स्नेहल कासारे, नगरसेवक राजेश ठाकूर, माजी नगरसेवक राजेश कोळी, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, सामिया बुबेरे, नित्यानंद भोईर, चंद्रकांत गायकवाड, रोहित पाटील, हितेश शहा, देवेंद्र घरत, सुरज म्हात्रे,परशुराम म्हात्रे, हेमंत भोईर, हस्तीमल मेहता, अजित भिंडे, मनोहर सहतीया, मनन पटेल, कृणाल समेळ, जितेंद्र पाटील, प्रमोद म्हात्रे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष कसा पुढे जाईल त्याचा विचार मनात ठेवा -आमदार महेश बालदी
भारतीय जनता पक्ष उरण तालुक्यात नंबर वन कसा होईल त्याकडे आपण सर्व प्रयत्न करू या, फक्त भारतीय जनता पक्ष कसा पुढे जाईल त्याचा विचार मनात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे नाव पुढे न्यायचे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे न्यायचे आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कार्यक्षम जिल्हा प्रमुख आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. मग काळजी करू नका आपण आपला पक्ष पुढे नेऊ यात शंका नाही, असे आमदार महेश बालदी यांनी प्रशिक्षण वर्गामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले.