Breaking News

वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांना हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार

पनवेल : प्रतिनिधी

हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार हा नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी 15 ऑगस्टला (स्मृतिदिनी) प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष होते. यंदा हा पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ व ज्योतिष विद्यावाचस्पती आनंद पिंपळकर यांना हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारकात आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी शिंपी समाजातील कर्तृत्ववान, यशस्वी समाजरत्नाचा सन्मान हा पनवेलचे सुपुत्र हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नावे पुरस्कार देऊन नामदेव शिंपी समाज युवक संघ करत असल्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. संघाचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नागेश हिरवे यांनी सत्कारमूर्तीना गोवा मुक्ती संग्रामाची पुस्तिका भेट दिली. या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पी. बी. कुंभार, हभप विशाल महाराज हाडवळे, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना अध्यक्ष परशराम गोडबोले, बाबासाहेब चिमणे, रवींद्र कालेकर, राष्ट्रीय जनसेना पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक खैरनार, नामदेव शिंपी समाज पनवेलचे अध्यक्ष विनायक नाजरे, उद्योजक सुभाष पांढरकामे,  योगिता मांढरे, अरुणा हिरवे, समस्त शिंपी समाज परिषदेचे अध्यक्ष रामचंद्रजी होमकर आदी उपस्थित होते.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त …

Leave a Reply