बनविले भारतातील पहिले ऑटोमेशन अॅप्लिकेशन
पाली ः प्रतिनिधी – डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि ऑटोमेशन क्षेत्रात आतापर्यंत पाश्चात्य कंपन्यांची मक्तेदारी होती. अनेक दिग्गज कंपन्या आपले ऑटोमेशन भारतात महागड्या भावाने विकत, पण आता या शर्यतीत पहिली संपूर्ण भारतीय कंपनी पुढे आली आहे. रायगड जिल्ह्यातील विहिघर येथील 27 वर्षीय पूजा हरड-म्हात्रे या अभियंता तरुणीने ही किमया साधली आहे. या कर्तबगारीमुळे तिचा जगभर बोलबाला सुरू आहे.
पूजा यांचे 10वीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात पनवेलमधील विहिघर येथे झाले. पनवेलच्या सीकेटी कॉलेजमधून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान विषयातून पदवी मिळविली आहे. अवघ्या सहा महिन्यांत पूजा यांनी प्रचंड मेहनत घेत हे अॅप्लिकेशन बनविले. या अप्लिकेशनचे नाव र्छीलश्रर्शीी आहे. छर्शीीीेंप र्-ीीेांरींळेप कंपनीच्या अखत्यारीत या अॅप्लिकेशनची निर्मिती झाली असून त्याचे ट्रेडमार्क अमेरिकेत ऍरिझोना येथे पूजा यांच्याच नावे आहे.
पूजा यांनी सांगितले की, र्छीलश्रर्शीी अॅप्लिकेशनचे यश इथपर्यंतच थांबत नाहीत, तर र्छीलश्रर्शीी ला उऊ-उ, खखढ कूवशीरलरव, इहरीरीं र्डीशिी र्उेािीींळपस यांच्याकडून ऑटोमेशनच्या निविदा भरण्यासाठी आवश्यक अटींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आदित्य बिर्ला, खउ-ठ, ऊएङकख या दोन्ही डेटा सेंटरमध्ये र्छीलश्रर्शीीने यशस्वी कार्य पूर्ण केले आहे. पूजा यांनी नासा वैज्ञानिक व मूळचे अलिबाग तालुक्यातील शहापूर येथील प्रणित पाटील यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली या अॅप्लिकेशनवर संशोधन पूर्ण केले आहे.
नवी मुंबई, ठाणे व रायगड येथे होणार्या स्मार्ट सिटी व डेटा सेंटर पार्कमध्ये र्छीलश्रर्शीी तसेच इतर ऑटोमेशन अॅप्लिकेशन महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील. आगामी काळात रायगड, नवी मुंबई व ठाण्यातील विद्यार्थ्यांनी ऑटोमेशन सेक्टरकडे एक उज्ज्वल पर्याय म्हणून पाहणे गरजेचे आहे. रायगडची स्मार्ट कन्या पूजा अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध आहे, असे नासाचे वैज्ञानिक प्रणित पाटील यांनी सांगितले.
आता भारताकडे स्थानिक स्मार्ट सिटी व डेटा अॅप्लिकेशन असल्याने यापुढे पाश्चात्य कंपन्यांवर असलेले अवलंबत्व संपुष्टात येऊ शकेल. र्छीलश्रर्शीीने फक्त महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारताचीसुद्धा मान उंचावली आहे.
-पूजा हरड-म्हात्रे, ऑटोमेशन अॅप्लिकेशन निर्मात्या