Breaking News

काशिदच्या समुद्रात बुडवून इसमाचा खून

मुरूड ः प्रतिनिधी – उसनवारी दिलेली रक्कम मागितल्याचा राग धरून रक्कम देणारा गणेश किसन ठोकळ (रा. कामरगाव, जि. अहमदनगर) यास सहा जणांनी मिळून मुरूड तालुक्यातील काशिद येथील समुद्रात बुडवून त्याचा खून केल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी 27 नोव्हेंबरला मुरूड पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 54-2020 भा. दं. वि. क. 302, 120 ब 34प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील मयत गणेश ठोकळने ऑगस्ट 2019मध्ये त्याच्या गावच्या काही जणांना (रा. कला मुंडवाल, जि. गाझीपूर, उत्तर प्रदेश) एक लाख रुपये उसनवारी दिले असता ते परत मागितले असता आरोपींनी संगनमत करून 6 सप्टेंबरला काशिद बिचवर गणेशला फिरण्यासाठी नेऊन पोहताना पाण्यात बुडवून त्याचा खून केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे अधिक तपास करीत आहेत.

मयत व्यक्तीच्या पत्नीने उसनवारीचे पैसे मागितल्यामुळे आपल्या पतीला पाण्यात बुडवून मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार शून्य केसप्रमाणे मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल.

-परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, मुरूड

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply