Breaking News

तिघे एकत्र या, नाही तर चौघे या…आम्ही एकटे पुरेसे आहोत!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कडाडले

सांगली : प्रतिनिधी

तुम्ही तिघे एकत्र या, नाही तर चौघे या. आम्ही एकटे पुरेसे आहोत, अशी गर्जना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तसेच जगात कोणावरही बोललो तरी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका का करतात हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर निवडणूक मतदानाच्या सांगलीमध्ये निमित्ताने आले असता बोलत होते.

सांगलीच्या चांदणी चौक येथील दमाणे हायस्कूल या ठिकाणी असणार्‍या मतदान केंद्राला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीसाठी रांगेत उभे राहून मतदान करण्यात येत असून, अत्यंत चांगला उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळाला आहे. म्हणून भाजपचा दावा आहे की, सहाच्या सहा जागा भाजप चांगल्या मताधिक्क्याने जिंकेल. विधान परिषदेमध्ये सध्या 60 असणार्‍या आमदारांमध्ये 25 भाजपचे आहेत. त्यामध्ये हे सहा जोडले तर 31 होतील आणि विधान परिषदेत भाजपचे बहुमत असेल. इतर सगळ्यांच्या मिळून 33 असतील. त्यामुळे महाराष्ट्रात आमचा प्रयत्न चालला आहे. तुम्ही तिघे एकत्र या, नाहीतर चौघे एकत्र या, मात्र आम्ही तुम्हाला एकटे पुरेसे आहोत, अशा शब्दांत पाटील यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले.

याचबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, मी जगात कोणावरही टीका केली. ती माणसे बोलत नाहीत, पण हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करतात. हे आता सगळ्यांना कोडे पडले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply