पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पाली येथील मराठा समाज सभागृहात सोमवारी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या एका पाहुण्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे पालीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण महादेव चव्हाण (वय 40) राहणार भांडुप ठाणे (पश्चिम)हे सोमवारी (दि.30) पाली येथील मराठा समाज सभागृह येथे लग्नासाठी आपल्या कुटुंबासह आले होते. लग्नाला वेळ असल्याने वडापाव (नाश्ता) आणण्यासाठी आय ट्वेंटी कार क्र एम एच 43 ए डब्लू 0048 स्वतः चालवीत घेऊन ते बाजारात गेले. यावेळी चर्मकार वाडा येथे आले असता
त्यांच्या छातीत चर्मकार वाडा येथे आले असता अचानक वेदना होऊ लागल्या, त्याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रवीण चव्हाण यांना तात्काळ उपचारासाठी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, यावेळी प्रवीण यांना तपासून येथील डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषित केले. सदर घटनेची य पाली पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस एस खेडेकर हे करीत आहेत.