Friday , September 29 2023
Breaking News

नाट्यगृह भाडे, सुविधांसंदर्भात भाजपचे आयुक्तांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सुट, नाट्यगृहाची दुरुस्ती तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. पटवर्धन यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या  आदेशामध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत कोरोना प्रतिबंध क्षेत्र वगळता नाट्यगृह, सिनेमा हॉल-मल्टीप्लेक्स, ड्रामा थिएटर 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेने पुन्हा चालू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाट्यगृह नव्याने सुरू होताना आसन क्षमतेपेक्षा 50 टक्के जागा उपलब्ध असणार आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या दृष्टीने ठाणे व नवी मुंबई महापालिकेने टिकिट दर 400 रुपयांपर्यंत असणार्‍या नाटकांना भाड्यात 75 टक्के सूट देऊन नाट्यसृष्टीस पुन्हा उभ करण्यासाठी मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर विचार करावा व मनोरंजनाच्या सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांना किमान 50 टक्के सवलत द्यावी. प्रत्येक प्रवेशव्दाराजवळ सॅनिटायझर स्टॅण्ड बसविणे आणि थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करावी. नाट्यविषयक चळवळीसाठी नाट्यगृहाच्या मागील बाजूस तळमजल्यावर मिनी थिएटरची व्यवस्था करता येईल, त्यासाठी एका आर्कीटेक्टची नेमणूक करावी. मुख्य पडदा व आतील पडदे बदलणे, विंगांचे कापड बदलणे, सर्व खुर्ची कव्हर बदलणे, प्रत्येक रंगपटातील पडदे बदलणे, व्हेंटीलेटर बसविणे, आरसे फुटले असतील तर बदलणे, प्रत्येक रंगपटाच्या (मेकअप रूम) खोलीत मुख्य सेंट्रलाईज्ड एसीपासून ते वेगळे करावेत तिथे नवीन स्प्लीट एसी बसवावेत जेणेकरुन विजेचा आवश्यक तेवढाच वापर होईल. खुर्च्यांवरील क्रमांक प्रिंट करणे, शिवून घेणे किंवा एम्ब्रॉयडरी करणे, नाट्यगृहाच्या मागील प्रवेशव्दाराजवळ वॉचमन केबिन उभारणे, रंगपटाच्या (मेकअप रूम)च्या बाहेरील व्हरांड्यात (लॉबीन) तसेच स्टेजच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, अग्निशमन यंत्रणा तपासून अद्ययावत करणे गरजेचे आहे. प्रवेशव्दारावर आगामी कार्यक्रमाचे बॅनर लावण्याकरिता इतर नाट्यगृहाप्रमाणे व्यवस्था उपलब्ध करून देणे, प्रतीक्षा लॉबीमध्ये (वेटींग एरिया) व भिंतीवरील पंखे बसविणे या सर्व गोष्टींची पूर्तता केल्याने नाट्यगृह व्यवस्थित सुरू करण्यास मदत होईल. त्याचबरोबर नाट्यगृहाच्या लौकीकात वाढ होऊन पनवेल महापालिकेचे नाव उज्ज्वल होण्यास मदत होईल, असेही अभिषेक पटवर्धन यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply