Breaking News

पेण-खोपोली मार्गावर तिहेरी अपघात; दोन जण जखमी

पेण : प्रतिनिधी

पेण खोपोली रस्त्यावर गागोदे गावच्या हद्दीत मोटरसायकल चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याच्या मागून येणार्‍या मोटरसायकल स्वारास अपघात झाला. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी कि, मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 :30 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी (रा. सोरडी ता. जत जिल्हा सांगली) हे पेण खोपोली रोडवरून आपल्या ताब्यातील टेलर (क्र. एनएल 01/एडी 2476) हा चालवित घेऊन जात असताना मौजे गागोदे हद्दीत व्हीकटर कंपनीचे वळणावर आले असता खोपोली बाजुकडून येणार्‍या मोटरसायकलवरील चालकाला त्याची मोटरसायकल कंट्रोल न झाल्याने तो रोडच्या साईडपट्टीवर गेला. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून येणारी ऍक्टिव्हा गाडी (नं. एमएच 06/ बीटी 7738) या वरील चालक व त्यांचे पाठीमागे बसलेला दुसरा व्यक्ती ट्रेलरच्या पुढील उजव्या बाजूच्या चाकाला घासल्यामुळे ते दोघेही खाली पडुन अपघात झाला. या अपघातात शंकर गोविंद उतेकर (55, रा. कुरमुर्ली पेण) व हिरामण रामा ठोंबरा (45, वर्षे रा. शेणे ता. पेण) हे जखमी झाले असून वैरागी हॉस्पीटल पेण येथे उपचार घेत आहेत. याप्रकरणी पेण पोलीस ठाणे येथे मोटार अपघात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक संतोष जाधव करीत आहेत.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply