Monday , October 2 2023
Breaking News

‘देशात डिसेंबरअखेर कोरोना लशीला मान्यता मिळेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या संकटाशी सामना करणार्‍या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरू आहे. यापैकी दोन लशींचे शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. गुलेरिया म्हणाले, भारतात अनेक लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या लशींपैकी कोणत्याही लशीचा आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याद्वारे सार्वजनिक लशीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होईल. कोल्ड चेन बनवणे, उपयुक्त स्टोअर वेअरहाऊस उपलब्ध करणे, रणनीती तयार करणे त्याचबरोबर लशीकरण आणि सिरिंजच्या उपलब्धतेसंदर्भात केंद्र आणि राज्यांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply