नऊ मंडळ अध्यक्ष आणि 25 कार्यकारिणी सदस्य
कर्जत ः बातमीदार
भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांनी जाहीर केली. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी किसान मोर्चाच्या कार्यकारिणीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर अध्यक्ष म्हसे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. दरम्यान, भाजप किसान मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीमध्ये नऊ मंडळ अध्यक्ष आणि अन्य 25 जणांचा समावेश आहे.
भाजप किसान मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष कर्जत येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते परशुराम म्हसे यांनी किसान मोर्चाची कार्यकारिणी उरण, पनवेल व कर्जत विधानसभा मतदारसंघांत असलेले भाजपचे पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्याशी सल्ला मसलत करून तयार केली. नऊ मंडळ अध्यक्ष व अन्य 25 जणांची कार्यकारिणीची यादी जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांनी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केली. किसान मोर्चाच्या कार्यकारिणीतील नव्याने नियुक्त करण्यात येणार्या यादीचे अवलोकन केल्यानंतर भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी किसान मोर्चाच्या यादीवर शिक्कामोर्तब केले. कार्यकरिणीत दोन सरचिटणीस, तीन जिल्हा उपाध्यक्ष, तीन चिटणीस, एक खजिनदार, नऊ मंडळ अध्यक्ष आणि 14 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.
भाजप किसान मोर्चात कर्जत तालुका मंडल अध्यक्ष म्हणून खांडपे येथील प्रगत शेतकरी शिवाजी पाटील, तर खालापूर तालुका मंडल अध्यक्ष म्हणून गोहे येथील निलेश शिंदे, उरण तालुका मंडल अध्यक्ष म्हणून आवरे येथील हरिश्वर म्हात्रे व पनवेल तालुका मंडल अध्यक्ष म्हणून गिरवले येथील प्रगत शेतकरी आत्माराम हातमोडे यांची नियुक्ती करण्यात आली. पनवेल शहर मंडल अध्यक्ष रूपेश परदेशी, खोपोली शहर मंडल अध्यक्ष सुधाकर दळवी, कामोठे शहर मंडल अध्यक्ष संभाजी चिपलेकर, कळंबोली शहर मंडल अध्यक्ष रवींद्र पाटील व खारघर शहर मंडल अध्यक्ष म्हणून संतोष रेवणे यांची निवड करण्यात आली. भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गोटीराम ढवळे-शिवकर पनवेल, चावजी गावंड-उरण यांची, तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कर्जत नेरळ येथील पराग गायकवाड, खालापूर तांबटी येथील गजानन दळवी आणि तिरकोन उरण येथील गणेश म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली. किसान मोर्चात जिल्हा चिटणीस म्हणून कर्जत रजपे येथील विनायक पवार, शिवकर पनवेल येथील किसन शिनारे व नंदनपाडा खालापूर येथील रमेश पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. किसान मोर्चाचे जिल्हा खजिनदार म्हणून पनवेल मोहपाडा येथील गुरुनाथ भोईर यांची निवड करण्यात आली आहे.
भाजप किसान मोर्चाच्या कार्यकारिणीत सदस्य म्हणून वसंत महाडिक-पळसदरी कर्जत, परशुराम आगीवले-मोग्रज कर्जत, मनोहर विशे-पाषाणे कर्जत, पमाबाई भस्मा नालधेवाडी, चंद्रकांत बाळाराम पाटील-वावंजे-पनवेल, बाळकृष्ण राम परदेशी-भिंगारी-पनवेल, विकास पाटील-रोडपाली पनवेल, रामचंद्र जाधव-खारघर पनवेल, श्रीकांत नलावडे-कामोठे, पनवेल, शांताराम पाटील-ताकई खालापूर, उल्हास पाटील-खोपोली, कृष्णा पाटील-पाणदिवे उरण, रोशन म्हात्रे-गावठाणे उरण, विजय म्हात्रे-वशिणी उरण आणि रामचंद्र बांदल-शीरवाडा, खालापूर अशा 25 जणांचा भाजप किसान मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत समावेश आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी असून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकर्यांनी अवजारे व तंत्रज्ञान वापरून प्रगत शेती केली. येथे भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. सर्व प्रगत शेतकर्यांना भाजप किसान मोर्चाच्या संघटन कार्यात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच भाजप किसान मोर्चा आणखी बळकट केला जाईल, असा विश्वास जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांनी व्यक्त केला आहे.