Monday , October 2 2023
Breaking News

मच्छिमार कोळी समाजाचे नेते दामोदर तांडेल यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्र मच्छिमार संघनेचे अध्यक्ष आणि मच्छिमारांचे लढवय्य नेते दामोदर तांडेल यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असताना आज त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले.
दामोदर तांडेल ह्यांनी गेली अनेक वर्ष मच्छिमार कोळी समजाच्या न्याया हक्कासाठी अनेक लढे दिले. मच्छिमारांना आपला व्यवसाय करताना कोणत्याही अडचणी येवू नये यासाठी ते नेहमी दक्ष असत. मच्छिमारांप्रमाणे अलिकडे ते ओबीसी संघटनेचे सुध्दा कार्य करू लागले होते. ओबीसी समाजालाही न्याय मिळावा त्यासाठी अलिकडे झालेल्या ओबीसांच्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने एक कुशल संघटक आणि लढवया नेता हरपला आहे, अशी प्रतिक्रीया ओबीसी व्हीजेएनटी जन मोर्चाचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांनी दिली.
दामोदर तांडेल यांनी मच्छिमार कोळी समाजाची गेली अनेक वर्ष उत्तम प्रकारे बांधणी केली होती. त्यांनी आता ओबीसी समाजाच्या संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष दिले असतानाच ते जावेत, याचे फार दुःख होते. कोळी आणि ओबीसी समाजाविषयी त्यांना आत्मियता  असल्याने त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी सबंध आयुष्य वेचले. एक लढवय्या सेनानी आपल्यातून निघून गेला आहे, अशी प्रतिक्रिया अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष शेतकरी नेते दशरथदादा पाटील आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे उपाध्यक्ष जे. डी तांडेल यांनी दिली.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply