मोहोपाडा ः प्रतिनिधी – बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश देसाई व सामाजिक विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या प्रयत्नाने वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय शिक्षण विभाग अलिबाग यांच्या आदेशानुसार व जीवन कला मंडळ रसायनीचे अध्यक्ष तुलसीदास पाटील यांच्या सूचनेनुसार कोविडसंदर्भात योग्य ती खबरदारी व काळजी घेऊन नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. वडगाव वाशिवली ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे सर्व वर्ग व प्रयोगशाळांची स्वच्छता करण्यात आली. सर्व शिक्षकांनी कोविडची चाचणी केली असता सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला.
कार्यक्रमास प्राचार्य विष्णू चेंडगे सर, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. अनिल पाटील, एकनाथ सोनवणे, प्राचार्य मोतीलाल सोनवणे, प्रा. संजय राणे, कलाशिक्षक संजय मोरे, प्रा. भास्कर जावळे, नाना सोनवणे, सारिका पाटील, शिक्षकेतर कर्मचारी वरिष्ठ लेखनिक अनिल पगारे, सखाराम हिंदोला, शशिकांत कावरे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी विद्यालयातर्फे बिर्ला कंपनीचे आभार मानण्यात आले.