Friday , September 22 2023

हैदराबादमध्ये भाजपची मुसंडी

अवघ्या चारवरून तब्बल 48 जागांवर झेप

हैदराबाद : वृत्तसंस्था
ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत 48 जागा जिंकल्या आहेत. तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस)ने सर्वाधिक 55 आणि एमआयएमने 44 जागी विजय मिळविला, तर काँग्रेसला दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
एका वॉर्डच्या मतमोजणीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने 150 पैकी 149 जागांचे निकाल लागले. गेल्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यांना मोठा फटका बसला आहे. ओवेसी बंधूंना बालेकिल्ल्यात या वर्षीही पन्नाशी गाठता आली नाही. त्यांच्या पारड्यात गतवेळीएवढ्याच 44 जागा आल्या. काँग्रेसही दोन जागांच्या पुढे सरकू शकली नाही. दुसरीकडे मागील वेळी अवघ्या चार जागा जिंकलेल्या भाजपने यंदा प्रस्थापित पक्षांना धक्का देत 48 जागी विजय मिळविला आहे.
भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरुवात : योगी
भाजपच्या यशानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करीत हैदराबादच्या जनतेचे आभार मानले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या
जनतेचे कोटी कोटी आभार! भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरुवात झाली आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपने या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएस या प्रादेशिक पक्षाला भाजपने आपला पर्याय निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे.
-भूपेंद्र यादव, भाजप प्रभारी

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply