Breaking News

विजयाची गुढी उभारा

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्व जण भाजपच्या विजयाची गुढी उभी करण्याचा संकल्प करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित आघाडी सरकारच्याच हाती या देशाची सूत्रे सोपवून विकासाच्या पदपथावर मार्गक्रमण करीत राहायचे आहे. मग विचार कसला करताय. उभारा विजयाची गुढी घरोघरी.

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात सर्वांचा आवडता सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू धर्मात विशेषकरून महाराष्ट्रात या सणाला विशेष असे महत्त्व अनादीकालापासून आहे. आजच्या युगातही या सणाची महती अखंडित राहिली आहे. भविष्यातही तिचा गोडवा असाच वाढत राहणार आहे. पंचाग शास्त्रानुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी पहिला शुभमुहूर्त म्हणूनही या सणाकडे मोठ्या उत्साहाने पाहिले जाते. कोणतेही चांगले काम सुरू करण्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा न करता या दिवशी सुरू केल्यास योजलेले काम तडीस जाते, अशीच भावना समस्त मराठी बांधवांची राहिली आहे. त्यामुळे आज साजर्‍या होणार्‍या गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने प्रत्येकाने जे जे मनात योजिलेले आहे ते चांगले निश्चित तडीस जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. चैत्रापासून धरतीदेखील आपले रूप बदलायला सुरुवात करते. कडक उन्हाने हैराण झालेल्या वसुंधरेला खर्‍या अर्थाने वरुणराजाची आस लागलेली असते. पुढील दोन महिने वैशाख वणव्याने ही धरणीमाता तावून सुलाखून निघणार आहे, पण तावून सुलाखून निघत असतानाच नवीन पालवीदेखील याच काळात फुटणार आहे. अनादीकालापासून चालत आलेला धरतीचा हा रितीरिवाज सध्या सगळीकडे सुखदपणे अनुभवयास मिळतोय. ते अलौकिक चित्र पाहण्याची विशाल दृष्टी फक्त मानवाकडे पाहिजे. दुर्दैवाने तीच दृष्टी आता गायब होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी धरतीचा, निसर्गाचा गैरवापर करताना दिसत आहे. वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण यामुळे निसर्ग संपदेचा सर्रासपणे गैरवापर होतोय. त्याचा परिणाम निसर्ग आणि नैसर्गिक संपदेवर होऊन त्याची झळ सर्वांनाच बसत आहे.दरवर्षी वरुणराजा धो धो कोसळत असतो. एवढा कोसळूनही ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सर्वांनाच सामोरे जावे लागते. हे भयावह दृष्य आपण सर्व जण जागोजागी पाहतोय. त्यात बदल करण्याचा निर्धार दरवर्षी करतो, पण पाऊस पडला की त्यावर पाणी पडते आणि सारे संकल्प पाण्यातच वाहून जातात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. जर निसर्गाचे योग्य तर्‍हेने संवर्धन झाले तर तो चांगला बहरेल आणि मानवी जीवनही सुखकर होईल. यंदाच्या गुढीपाडव्याला देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय. आणखी महिनाभर लोकशाहीचे हे द्वंद्व सुरूच राहणार आहे. यामधून आपल्याला सद्सद्विवेकबुद्धीला जागून देशाचे, समाजाचे भले करणार्‍यांच्या हाती या राष्ट्राची सत्ता सोपवायची आहे. त्यासाठी भाजपसारखा कणखर पर्याय आपल्याकडे आहे. गेल्या पाच वर्षांत देशाच्या विकासासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोेदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनताभिमुख असे काम करीत आहे. तेच सरकार यापुढेही आपल्या देशाला आणि राज्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी कटिबद्ध आहे. अशा सरकारलाच पुन्हा सत्तेवर बसवा. पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Check Also

सत्ता कुणाची?

विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये प्रचारात भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्याखालोखाल …

Leave a Reply