Breaking News

कोप्रान कंपनीविरोधात कामगारांचे उपोषण

खालापूर : प्रतिनिधी

आपल्याला कामावर घ्यावे, या मागणीची तड लावण्यासाठी संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार या कंत्राटी कामगारांनी कोप्रान कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार हे दोघे कोप्रान कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून सोळा वर्षापासून काम करीत होते. त्यांना कोणतीही सूचना न देता ऐन दिवाळीच्या तोंडावर ठेकेदाराने तडकाफडकी कामावरून काढून टाकले. त्या वेळी संदेश आणि अनिरूध्द त्यांच्या कुटुंबियांसह 11नोव्हेंबरपासून कारखाना परिसरात बेमुदत उपोषणाला बसले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर कामगार आयुक्तांनी मध्यस्थी करून व्यवस्थापनाबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे करताडे आणि पवार यांनी उपोषण मागे घेतले होते. परंतु महिना उलटून गेला तरीही कंपनी व्यवस्थापन बैठक घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply