पनवेल ः प्रतिनिधी
भटके-विमुक्त आघाडी रायगड यांच्या वतीने बुधवारी (दि.9) उत्तर रायगड जिल्हा दौरा करण्यात आला. या वेळी भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश कोकण सहसंयोजक भास्कर यमगर, रायगड उत्तर जिल्हा संयोजक बबन बारगजे व सहसंयोजक उत्तम जरग उपस्थित होते. कामोठे, कळंबोली, पनवेल शहर, पनवेल ग्रामीण, कर्जत, खालापूर, खोपोली या विभागांत दौरा पार पडला. या दौर्याची सांगता उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर बैठक घेऊन करण्यात आली.
भटके-विमुक्त आघाडीची ताकद वाढविण्यासाठी व तळागाळातील लोकांपर्यंत भाजपचे विचार पोहचवण्यासाठी कंबर कसली आहे. आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकण प्रांत सहसंयोजक भास्कर यमगर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी संपूर्ण जिल्हा दौरा करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले. उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.