Breaking News

रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमाला मदत

रोहे : प्रतिनिधी

कोएसोच्या रोहे येथील मेहेंदळे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी कोलाड जवळील संभे गावातील काळकाई वृद्धाश्रमाला रविवारी (दि. 3) तीन बेड भेट दिले. कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगात खळबळ माजवली होती, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. त्या काळात रोहे येथील मेहेंदळे हायस्कूलच्या 1997-98 च्या दहावीच्या बॅचने कोरोनाच्या रुग्णांना मदत म्हणून काही निधी जमा केला होता. या निधीतून दोन तसेच ग्रुपमधील सदस्य देवेंद्र मुंढे यांनी दिलेल्या निधीतून एक मिळूण एकूण तीन बेड कोलाड जवळील संभे गावातील काळकाई वृद्धाश्रमाला रविवारी भेट दिले. संस्थेच्या सुनंदा मोहिते यांनी सर्वांचे स्वागत केले. माजी विद्यार्थी प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. याच बॅचचे विद्यार्थी डॉ.मनीष वैरागी यांनी सदर उपक्रमामागचा ग्रुपचा हेतू विशद केला. 1997-98 च्या दहावीचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. त्यांनी आश्रमातील वृद्धांची आस्थेने चौकशी केली. वृद्धाश्रमाच्या संचालिका सुनंदा मोहिते यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण देशपांडे, भालचंद्र पवार, प्रांजली थोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply