अलिबाग : रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीही रात्रीच्या सुमारास चमकणार्या निळ्या लाटांचा नजारा अनुभवायला मिळतो आहे. अलिबागजवळच्या नागाव किनारी बुधवारी रात्रीच्या सुमारास निळ्या रंगाच्या लाटा पहायला मिळाल्या. किनार्यावर फिरायला गेलेल्या काही तरुणांनी या लाटा पाहिल्या आणि मोबाइलमध्ये टिपल्या. लाटा उजळून टाकणारे हे जीव आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटिल्युका. समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनार्यावर येतात आणि एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रकार समोर आला आहे, मात्र असे काही असल्याची माहिती आमच्याकडे नाही. आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी म्हटले आहे.
Check Also
पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …