Breaking News

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारणेंना संधी द्या; जेएनपीटी टाऊनशिपमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन

जेएनपीटी ः वार्ताहर

जे कोणाला जमले नाही ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत करून दाखविले. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र मोदींच्या रूपाने रामराज्य आणण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी सज्ज होऊ या. श्रीरंग बारणे या मतदारसंघातील खासदार म्हणून आपल्या कार्यासाठी तत्पर असल्याचे आपण पाच वर्षांत पाहिले आहे. अशा अभ्यासू लोकप्रतिनिधीला पुन्हा जनतेचे नेतृत्व करण्यासाठी व विरोधकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.

पंतप्रधानांनी सबका साथ, सबका विकास, अशी हाक देत देशात विकासगंगा आणली. घारापुरी बेटावर विद्युत पुरवठा करण्याचे काम भाजप सरकारने केले. मावळ लोकसभा मतदारसंघाचा मावळा म्हणून मी येथील जनतेला, प्रकल्पग्रस्तांना भेडसावणार्‍या समस्यांचे निवारण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मला शिवसेना-भाजपा युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारराजाने संधी द्यावी आणि पवार कुटुंबीयांना बारामतीचा रस्ता दाखवावा, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले.

33 मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण जेएनपीटी (टाऊनशिप) येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये  महायुतीचा मेळावा मंगळवारी (दि. 2) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे ट्रस्टी महेश बालदी, शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, बबनदादा पाटील, माजी जिल्हाप्रमुख तथा जेएनपीटीचे ट्रस्टी दिनेश पाटील, रवि पाटील, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, युवा नेते महेश कडू, दिनेश तांडेल, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, भाजपा महिला अध्यक्षा संगीता पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी. एन. डाकी, रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, चिटणीस निळकंठ घरत, मेघनाथ म्हात्रे, सुनील पाटील, उपनगराध्यक्ष जयवंत कोळी, मा. सरपंच विलास पाटील, प्रदीप नाखवा, मा. शहरप्रमुख महेंद्र पाटील, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, नरेश मोकाशी, बबन पाटील, सरपंच बळीराम ठाकूर, दामूशेठ घरत, सुरेश पाटील, राजा पडते, महेंद्र वर्तक, दिक्षा पाटील, दीपक ठाकूर, हिराजी घरत, रिना घरत, महिला संघटक ज्योती म्हात्रे, गणेश शिंदे, तसेच आजी-माजी नगरसेवक आणि सरपंच उपस्थित होते. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होतील आणि शरद पवारांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मावळमधून शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे दणदणीत मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी सज्ज होऊ या, अशी हाक शिवसेनेचे संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांनी देऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे आवाहन केले. उरणच्या विकासासाठी तसेच भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पवार कुटुंबीयांच्या उमेदवारास पराभवाची धूळ चाखण्यासाठी सज्ज होऊ या, असे आवाहन महेश बालदी, दिनेश पाटील, रविशेठ भोईर यांनी मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

Check Also

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच …

Leave a Reply