Breaking News

‘काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा आहे, त्यांनी दिलेली आश्वासने देशासाठी घातक ठरू शकतात असे म्हणत भाजप नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. देशद्रोह हा काँग्रेसला गंभीर गुन्हा वाटत नाही का, असा सवालही जेटली यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी (दि. 2) त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याची भाजप नेते अरुण जेटली यांनी चिरफाड करीत काँग्रेस नेत्यांचा समाचार घेतला आहे. काँग्रेसने जी आश्वासने दिली आहेत ती देशासाठी घातक आहेत. देशाचे विभाजन होईल अशा अनेक बाबी या जाहीरनाम्यात मांडण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी देशाचे तुकडे करू पाहणार्‍या गँगसोबत बसून या जाहीरनाम्यातील आश्वासने लिहिली आहेत असे वाटते, अशा शब्दांत जेटलींनी तोंडसुख घेतले आहे.

काँग्रेस पक्षाने जी आश्वासने दिली आहेत ती लष्कर कमकुवत आणि त्यांच्यावर दगडफेक करणार्‍यांना बळकट करणारी आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती संपुष्टात येण्याऐवजी ती वाढवण्याचा विचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतो असे सांगून, या जाहीरनाम्यात काश्मिरी पंडितांचा उल्लेखही नाही, असा आरोप जेटली यांनी केला आहे.

ज्या योजना आणण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यासाठी बजेट कुठून येणार, असाही प्रश्न जेटली यांनी उपस्थित केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply