Friday , September 22 2023

खांदा कॉलनीत फुटपाथवरील ड्रेनेजना झाकणे; नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : वार्ताहर

प्रभाग 18मधील खांदा कॉलनी येथील सेक्टर 12 येथे फुटपाथवरील ड्रेनेजना झाकणे बसविण्यात आली आहेत. ड्रेनेजना झाकणे बसविण्यासंदर्भात भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत हे कार्य करण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी विक्रांत पाटील यांचे आभार व्यक्त केले. नगरसेवक विक्रांत पाटील हे प्रभागातील विकासकामांसोबत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. माझा प्रभाग, माझी जबाबदारी यानुसार नेहमीच कर्तव्यदक्षपणे जनसेवेसाठी ते तत्पर असतात. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सोयी उपलब्ध करून देणे ही नेहमीच त्यांची प्राथमिकता असते. प्रभाग 18 मधील सेक्टर 12 खांदा कॉलनी येथील नागरिकांनी फुटपाथवरील ड्रेनेजला झाकणे नसल्याबाबत नगरसेवक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी संभाव्य धोका लक्षात घेत दोन्ही ठिकाणी बॅरिकेट्स व पट्ट्या बांधून घेतल्या. तसेच सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठपुरावा करून दोन्ही ठिकाणी त्वरित झाकणे टाकून घेतली. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल सेक्टर 12 खांदा कॉलनीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत त्यांना धन्यवाद दिले. असे सातत्याने जनसेवेसाठी वाहून घेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे नगरसेवक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply