Breaking News

काँग्रेसच्या 2014च्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंह जबाबदार

प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सतत होत असलेल्या पराभवांमुळे काँग्रेसमधील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभ राहत असताना आता माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून काँग्रेस हायकमांडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी 2014च्या काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना जबाबदार धरले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी आपले पुस्तक ’द प्रेसिडेंशियल इयर्स’मध्ये लिहिले आहे की, आपली राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील मुद्द्यांना सांभाळू शकल्या नाहीत, तर मनमोहन सिंग यांची संसदेतील अनुपस्थितीमुळे खासदाराशी त्यांच्या वैयक्तिक संबंधांवरही पूर्णविराम लागला. माझ्या पक्षातील काही सदस्यांचे असे मत होते की 2004मध्ये जर पंतप्रधान असतो तर 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसवर दारूण पराभव ओढवला नसता, परंतु या मताशी मी सहमत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
प्रणव मुखर्जी यांचे पुस्तक जानेवारी 2021मध्ये प्रकाशित होणार आहे. त्यांनी हे पुस्तक आपल्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळातील अनुभवावर लिहिले होते. या पुस्तकात पश्चिम बंगालच्या एका गावात मुखर्जी यांनी घालवलेल्या बालपणापासून ते राष्ट्रपतिपदापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. यात मुखर्जी यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे, ज्या गोष्टींवर आधी ते कधीच बोलले नव्हते.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply