Breaking News

शेतकर्यांनी देशी गायी पाळून त्यांचे संगोपन करावे -डॉ. सुभाष म्हस्के

मुरूड : प्रतिनिधी

कोकणातील शेतकर्‍यांनी भाजीपाला उत्पादनाबरोबरच आपापल्या गटामध्ये प्रत्येकी पाच देशी गायी पाळून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी केले.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने  नांदगाव (ता. मुरूड) येथील माळी समाज सभागृहात नुकतीच कोकण विभागीय कृषी फलोत्पादन, दुग्धविकास व पशुसंवर्धन परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात डॉ. सुभाष म्हस्के उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. देशी गायीचे दूध चांगल्या प्रतीचे असल्यामुळे या दुधाचा कोकण ब्रॅण्ड करण्याची आपणाला नामी संधी आहे. ज्यामुळे आपले आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी प्रास्ताविकात परिषदेचा हेतू विषद केला. मुरूड पं. स.च्या माजी सभापती स्मिता खेडेकर, जि. प.चे माजी  सदस्य सुभाष महाडिक, जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे राम मोहिते, निलेश देसले, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दिवेकर यांचीही या वेळी समयोचित भाषणे झाली. सुरेश पाटील यांनी परिषदेचे सूत्रसंचालन केले. या परिषदेला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply