Breaking News

साई खैरावाडी येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

माणगाव : प्रतिनिधी

सूर्योदय फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन यांच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील साई खैरावाडी गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचे  भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक, जैन इरिगेशनचे इंजिनिअर रणजित निकम व अनंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

माणगाव तालुक्यातील साई गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर आणि 800 फूट उंचीवर डोंगराळ भागात असलेल्या खैरावाडीत 45 कुटुंबे आहेत.

स्वदेश संस्थेने साई गावातून जलवाहिनीद्वारे खैरावाडीला पाणीपुरवठा सुरू केला होता, मात्र अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे जून महिन्यापासून खैरावाडीचे पाणी बंद झाले होते. ही माहिती ग्रामस्थांनी समाजसेवक कृष्णा महाडिक यांना सांगितली. त्यांनी पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचे सूर्योदय फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन कंपनी यांच्या सहकार्याने खैरावाडीसाठी नवीन पाणीपुरवठा योजना मिळविली आहे. या योजनेचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या वेळी खैरावाडीचे अध्यक्ष प्रकाश धुमाळ, ज्येष्ठ नागरिक विठोबा दर्गे, विठोबा साबळे, मुंबई मंडळ सल्लागार शांताराम खेडेकर, दत्ताराम तांबडे, नामदेव खेडेकर, बोरीचामाळ गावातील शिवाजी गायकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply