Breaking News

मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकू नये!

महाड कोविड सेंटरवरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कडाडले

महाड : प्रतिनिधी
कोरोना महामारी नियंत्रित करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. महाड कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा निर्माण होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जबाबदारी झटकू नये, असा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला. दरेकर यांनी गुरुवारी (दि. 24) महाड एमएमए कोविड सेंटरची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.
या पाहणी दौर्‍यात विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यासोबत भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, नाना महाले, मनोज भागवत, प्रसंन्न पालांडे आदी होते.
या वेळी एमएमएचे अध्यक्ष पाठारे यांनी कोविड सेंटरबाबत माहिती दिली व सुविधा अपुर्‍या असल्याचे सांगितले. बिपीन महामुणकर यांनी हे कोविड सेंटर गोरगरीबांच्या उपयोगाचे नसल्याचा आरोप केला. त्यावर हे अपयश महाविकास आघाडी सरकारचे असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड सेंटरचे उद्घाटन केले असल्याने त्यांनी याबाबत आपली जबाबदारी झटकू नये, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, महाडच्या तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील बेघरांना सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन घरे द्यावीत अशी मागणी करून निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्यांपैकी काही जणांना अद्याप मदत मिळालेली नाही, ती त्वरित देण्याच्या सूचना दरेकर यांनी तहसीलदार सुरेश काशिद यांना दिली. महाड पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील या वेळी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply