नागोठणे ः प्रतिनिधी
विभागातील भाजप कार्यकर्त्यांची नुकतीच विविध पदांवर नेमणूक करण्यात आली. ह्या पदाधिकार्यांना आमदार रविशेठ पाटील यांच्या पेण येथील वैकुंठ निवासस्थानी शनिवारी (दि. 12) सायंकाळी आमदार रविशेठ पाटील आणि पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते एका छोटेखानी समारंभात नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. रोहा उप तालुकाध्यक्ष मनोज धात्रक, विठोबा माळी, नागोठणे जिल्हा परिषद गण अध्यक्ष शेखर गोळे, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, विभागीय सरचिटणीस संतोष डाकी, तर नागोठणे महिला विभागीय अध्यक्ष श्रेया कुंटे, शहर महिला उपाध्यक्ष मुग्धा गडकरी, शहर महिला सरचिटणीस सोनाली पडवळे, उत्तर भारतीय सेल शहर अध्यक्ष सोनी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, स्वाती कुंटे यांच्यासह विभागातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.