Breaking News

‘…तर जानेवारीपासून भारतात लशीकरण’

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनावरील कोविशिल्ड लस तयार करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोरोना लशीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने लशीला मान्यता दिली, तर भारतात जानेवारीपासून लशीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.
इकॉनॉमिक्स टाइम्स ग्लोबल बिझनेस समीटमध्ये बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, या महिन्याच्या अखेरीपर्यंत आम्हाला आपत्कालीन वापरासाठीचा परवाना मिळण्याची शक्यता आहे, पण व्यापक स्वरूपात लशीचा वापर करण्याचा मूळ परवाना नंतर मिळण्याची शक्यता आहे. तरीही आम्हाला विश्वास आहे की केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने मान्यता दिल्यास भारतात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.
एकदा भारताला 20 टक्के कोरोना लस मिळाली की, आपल्यामध्ये आत्मविश्वास व भावना पुन्हा परत येतील अशी आशा आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत प्रत्येकासाठी पुरेशी लस उपलब्ध होईल आणि जनजीवन पूर्वपदावर येईल, असा विश्वासही पुनावाला यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कोरोनावरील लशीचा आपत्कालीन वापर करण्याचा परवाना द्यावा यासाठी तीन औषध निर्माण कंपन्यांनी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे अर्ज केले आहेत. यामध्ये फायझर इंडिया, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांचा समावेश आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply