पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनासारख्या एका अदृश्य शत्रूने संपूर्ण जगाला वेठीस धरले. या वेळी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आदींनी या कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची बाजी लावली. या लढाईत जे कोरोना योद्धे शहीद झाले त्यांच्यासाठी शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने अपेक्षा कॉम्प्लेक्स आकुर्ली येथे एक दिवा शहिदांसाठी या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अपेक्षा कॉम्प्लेक्स व परिसरातील लोकांनी उपस्थित राहून शहिदांना आदरांजली वाहिली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आकुर्ली गावचे सरपंच सचिन पाटील, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई प्रभारी व प्रेस क्लब पनवेलचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर, साप्ताहिक आदिवासी सम्राटचे संपादक व आदिवासी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गणपत वारगडा, स्नेहकुंज आधारगृहाचे संचालक नितीन जोशी, यशकल्प फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त यशवंत बिडये, पोलीस मित्र महेश अनपट, शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पवार, सचिव संतोष कदम, सदस्य प्रशांत पवार, आत्माराम लोखंडे, शरद देशमुख, संतोष जाधव, सिद्धेश सुळे, शशिकांत सुळे, यशवंत सकपाळ, राजेश मुंडे, जावेद मुलानी, राकेश दुबे, स्नेहा बांदकर, श्रीमती भोसले, श्रीमती ननावरे, श्रीमती नवाडकर, श्रीमती मुंडे यांच्यासह अपेक्षा कॉम्प्लेक्स, मातेश्वरी नगर व परिसरातील सोसायटीमधून कोविडचे नियम पाळून नागरिक उपस्थित होते.