Breaking News

महिलांचे प्रत्येक क्षेत्रात सक्षम स्थान -अ‍ॅड.माधवी नाईक

पनवेलमध्ये हातमाग साडी प्रदर्शन आणि पैठणीचा खेळ

पनवेल : रामप्रहर वृत्त
अष्टावधानी असण्याचे वरदान हे महिलांनाच आहे. त्यामुळे महिला ज्या क्षेत्रात पाऊल टाकेल त्यामध्ये ती सक्षमतेने स्वतःचे स्थान निर्माण करून शकते, असे प्रतिपादन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विमानतळ प्राधिकरणाच्या स्वतंत्र संचालीका अ‍ॅड.माधवी नाईक यांनी पनवेलमध्ये महिलांसाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमावेळी केले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शकुंतला ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
भाजप महिला मोर्चा पनवेल शहर तर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच हातमाग दिवसाचे औचित्यसाधून वस्त्रवारसा हातमाग साडी प्रदर्शन, फॅशन शो तसेच खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरटिणीस तथा विमानतळ प्रधिकरणाच्या स्वतंत्र संचालीका अ‍ॅडव्होकेट माधवी नाईक यांच्याहस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. पनवेलकरांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष रुचिता लोंढे आणि पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंझाराव यांच्या पुढाकाराने आयोजित प्रदर्शनात विविध प्रकारचे हातमाग साड्यांचे स्टॉल्स लावण्यात आलेत.
यामध्ये विणलेल्या पैठणी साड्या, तसेच अन्य पारंपरिक हातमागावरील वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले. याव्यतिरिक्त, खेळ पैठणीचा यांसारखे मनोरंजक खेळही आयोजित करण्यात आले होते,, ज्यामुळे महिलांचा सहभाग अधिक वाढला. या कार्यक्रमाची आणखी एक खास बाब म्हणजे, फॅशन शो! या फॅशन शो मध्ये महिलांनी हातमागावरील साड्या परिधान करून रॅम्प वॉक केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आर्शिवादामुळे मला अधिक काम करण्याची उर्जा मिळते असे सांगून आयोजकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला अनेक सामाजिक संस्था, बचत गट आणि महिला मंडळांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये साईनगर चॅनल उपवन, अभिनव महिला मंडळ, नाच गा घुमा, गार्गीज ग्रुप, जागृती महिला मंडळ, रमाई महिला मंडळ, पनवेल स्मार्ट मॉमीस, स्वयंसहाय्यता महिला मंडळ, जी.एस फाऊंडेशन, जय भवानी महिला मंडळ, एकविरा महिला मंडळ, लहुजी महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, श्री समर्थ महिला मंडळ यांचा समावेश होते. त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. दरम्यान, खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विजेत्या महिलालेला पैठणीसाठी आणि पीएनजीतर्फे सोन्याची नथ आणि इतर स्पर्धकांना विविध आकर्षित बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तसेच या वेळी लकी ड्रॉ काढण्यात आला असून विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस चारुशीला घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, मोहिनी पाटील, ममता म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, प्रीती जार्ज, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, नीता माळी, वर्षा नाईक, सुजाता ठक्कर, शहर सरचिटणीस अमित ओझे, रूपेश नागवेकर, उपाध्यक्ष प्रितम म्हात्रे, साधना पाटील, लीना पाटील, समीना साठी, प्रकाशन यमुना यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply