Breaking News

भाजप उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड

उरण : वार्ताहर

भारतीय जनता पक्ष उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर यांनी दिले.

या वेळी उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजप उरण व्यापारी असोसिएशनचे संयोजक हितेश शाह, उपाध्यक्ष मनोहर सहतीया, सेक्रेटरी हस्तीमल मेहता, माजी नगरसेवक राजेश कोळी, मनन पटेल, अजित भिंडे, नितीन पाटील आदी उपस्थित होते. उपस्थितांनी नरेश गावंड यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply