Breaking News

नव्या वाहनांसाठी घ्या आकर्षक नंबर…! पनवेल आरटीओत नवी बी क्यू सिरीज

कळंबोली ः रामप्रहर वृत्त

राज्यात सर्वाधिक महसूलचा टप्पा पार करणार्‍या पनवेल प्रादेशिक परीवहन कार्यालयात आता वाहनांच्या नंबरची नवीन एमएच बी क्यू क्रमांकाची सिरीज दहा ते पंधरा दिवसात सुरू होणार असल्याने नवीन वाहन खरेदी करणार्‍या वाहनधारकांना जर आकर्षक नंबर हवे असल्यास पनवेल आरटीओ कार्यालयात संर्पक साधण्याचे आवाहन पनवेल प्रादेशिक कार्यालयाने एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनाला आपल्या जन्म तारखेचा क्रमांक मिळावा, ही बहुतांशी वाहनधारकांची इच्छा  असते. या करीता परिवहन कार्यालयात हेलपाटे माराव्या लागतात. काही वर्षापूर्वी यातून सरळ आरटीओने मार्ग काढून लकी नंबरचे पैसे भरा आणि हवा तो आकर्षक क्रमांक वाहनाला मिळवा, अशी योजना सुरु केली. या योजनेला चांगला प्रतिसादही मिळू लागला. सर्वाधिक महसूल जमा करणारे पनवेल आरटीओ कार्यालय हे अव्वल स्थानी पोहोचले. आता पनवेल प्रादेशिक परीवहन कार्यालयात एमएच 46 बीक्यू क्रमांकाची नवीन सिरीज दहा ते पंधरा दिवसानंतर सुरू होणार आहे. तरी ज्यांनी नवीन वाहन खरेदी केले आहे किंवा जे नवीन वाहन खरेदी करणार आहेत व त्यांना आकर्षक वाहन क्रमांक हवा असेल तर थेट पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संर्पक साधण्याचे आवाहन पनवेल प्रादेशिक परीवहन कार्यालयाने केले आहे. शासनाच्या महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989च्या नियम 54 अ अन्वये ज्यांना आकर्षक नंबर राखीव करावयाचे असतील, त्यांनी संर्पक साधून विहीत शुल्क भरुन आकर्षक नंबर राखीव करू शकतात, असेही कळविण्यात आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply