Breaking News

विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी -अरुणशेठ भगत

गव्हाण विद्यालयात एचएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आयुष्यात उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांनी केले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या शुभचिंतन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माईताई भोईर, उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेवराव ठाकूर, उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

इयत्ता बारावीची विद्यार्थिनी प्रज्ञा चौधरी हिने अत्यंत प्रवाही शैलीत सूत्रसंचालन केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी तिचा व इतर विद्यार्थिनींचा विशेष सन्मान केला. सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने पनवेल तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयातील सातवी ची विद्यार्थिनी दीक्षा वर्तक हिने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचाही सन्मान करण्यात आला.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply