Breaking News

अनियंत्रित कार थेट समुद्रात

उरणमधील घटना

उरण : वार्ताहर

वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट समुद्रामध्ये गेल्याची घटना उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी रविवारी (दि. 20) घटली. दुपारच्या सुमारास ही चारचाकी समुद्राच्या खडकांमध्ये गेली.

उरण पिरवाड समुद्र किनारी मारुती (क्र. एमएच 02  बीएम 1829) ही रिट्झ सफेद रंगाची फोर व्हीलर घेऊन काही पर्यटक फिरायला आले होते. या वेळी समुद्र किनारी असलेल्या हेलीपॅड वरून चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने गाडी तीन ते चार गोलांट्या खाऊन थेट समुद्रात गेली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

गाडीचा अपघात समजताच जवळच असलेल्या ओएनजिसी  कंपनी येथील फायर ब्रिगेड व कमांडो व उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे घटनास्थळी पोहचले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply