Breaking News

अलिबागच्या वरसोली येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त उत्सव

अलिबाग : प्रतिनिधी

मार्गशीर्ष महिन्यात येणार्‍या षष्ठीला चंपाषष्ठी म्हणून संबोधले जाते. या दिवशी खंडोबाचा उत्सव साजरा होतो. रविवारी चंपाषष्ठीच्या निमित्ताने सर्वत्र खंडोबाचा उत्सव साजरा झाला. अलिबागेतील वरसोली कोळीवाडा येथे प्रतिजेजुरी म्हणून नावारुपाला आलेल्या खंडोबा मंदिरातही जय मल्हारचा आवाज घुमला.

वरसोली कोळीवाड्यात आंग्रेकालीन खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करण्याची फार जुनी परंपरा आहे. रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून मंदिरात धार्मिक विधी झाले. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी उत्सवानिमित्त महाप्रसाद देण्यात येतो, मात्र कोरोनामुळे तो यावर्षी रद्द करण्यात आला.

अनेकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे चंपाषष्ठीच्या दिवशी आवर्जून दर्शन घेतले जाते. त्यानुसार वरसोलीच्या खंडोबा मंदिराला भाविकांनी दर्शनासाठी भेट दिली. दरम्यान चंपाषष्ठीचा हा उत्सत्व जिल्ह्यातील अनेक भागात साजरा झाला. सारळ येथे बापदेव मंदिरात दरवर्षी चंपाषष्ठीनिमित्ताने बापदेवाचा उत्सव साजरा होतो.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply