Breaking News

रस्त्यासाठी शिवसेनेवरच आंदोलनाची वेळ

रेवदंडा पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने बांधकाम खाते अखेर राजी

रेवदंडा : प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यातील रेवदंडा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, हे रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, यासाठी राज्यातील सत्तारूढ शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवरच रास्ता रोको करण्याची वेळ आली होती. दरम्यान, रेवदंड्याच्या पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी रस्ता दुरूस्ती व डांबरीकरणाचे आश्वासन दिल्याने शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.

रेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जा-ये करणे जिकिरचे बनले झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या  दुरूस्ती व डांबरीकरणाच्या कामास 2018-19मध्ये मंजूरी देण्यात आली असून, या कामाची निविदा सुप्रभात इन्फाझोन या कंपनीस मिळाली आहे, मात्र अद्यापीही या रस्त्याच्या कामास सुरूवात झालेली नाही तसेच बेलकडे ते रेवदंडा या मुख्य रस्त्यावर आणि चौल नाक्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांचे काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले होते, मात्र अद्यापही या रस्त्यांची दुरूस्ती व डांबरीकरणाचे काम झालेले नाही. रेवदंडा बाजारपेठ ते मोठे बंदर आणि चौलनाका ते भोवाळे या रस्त्याचीसुध्दा दयनीय अवस्था झाली आहे. या सर्व नादुरूस्त रस्त्यांच्या दुरूस्ती व डांबरीकरणाची कामे सात दिवसांत हाती घ्यावीत; अन्यथा 24 डिसेंबर रोजी रेवदंडा हायस्कूल येथे आणि 28 डिसेंबर रोजी चौल नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे 3 डिसेंबर रोजी दिला होता.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply