उरण : रामप्रहर वृत्त – उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावासाठी सिडकोच्या निधीतून अडीच लाख लीटर पाण्याची टाकी बसविण्यात येत आहे. या टाकीचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 25)आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या टाकीसाठी उपसरपंच अमर म्हात्रे, नंदकुमार ठाकूर, अश्विन नाईक, अण्णा गडकरी आणि परिवार यांनी वर्षभरापासून पाठपुरावा केला होता. त्यांच्या विशेष मेहनतीने व सहकार्याने गावासाठी पाण्याची टाकीच्या कामाचा शुभारंभ झाला.
या वेळी उद्योगपती वैभव देशमुख, जि. प. सदस्य रविशेठ पाटील, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, उपसरपंच अमर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य योगिता नाईक, गीता ठाकूर, विमेश म्हात्रे, मंजूळा कोळी, वहाळचे माजी उपसरपंच रामदास नाईक, तुकाराम म्हात्रे, अण्णा गडकरी, मच्छींद्र कोळी, प्रवीण ठाकूर, अभिमन्यू दापोलकर, उद्योजक प्रीतम नाईक, सदानंद कोळी, पदाजी नाईक, नाना गडकरी, शालीक भोईर, केसरीनाथ नाईक, बाबूराव भोईर, नामदेव खोत, एकनाथ गोंधळी, गजानन खोत, विशाल नाईक, सूहास म्हात्रे, पोलीस अधिकारी अलंकार म्हात्रे, प्रभाग 19 अध्यक्ष प्रिया अडसूळे, प्रभाग 18 अध्यक्ष प्रिती चंदेल, गाव अध्यक्ष सूवर्णा ठाकूर, गाव उपाध्यक्ष दिपक गोंधळी, नारायण खोत, धावजी म्हात्रे, सदाशिव खोत, निलेश खोत, नामदेव कोळी, कान्हा कोळी, गोपी भोईर, हर्षल नाईक, समाधान भोईर, धर्मा नाईक, गोमा भोईर, किरण म्हात्रे, रमेश कडू, निलेश खारकर, उपेंद्र नाईक, कुणाल गोंधळी, रवींद्र नाईक, निलेश म्हात्रे, नामदेव नाईक, भाई खोत, गणेश नाईक, सूर्यकांत गडकरी तसेच युवा व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी उपसरपंच अमर म्हात्रे, अश्विन नाईक, नंदकुमार ठाकूर, अण्णा गडकरी व ग्रामस्थ मंडळ बामणडोंगरी यांचे सहकार्य लाभले.