Breaking News

मंडी आणि किमान आधारभूत किंमत नष्ट होणार नाही -राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असतानाच, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) नष्ट करण्याचा या सरकारचा हेतू कधीही नव्हता, ना आहे, ना कधी असेल. मंडी व्यवस्थाही कायमच राहणार आहे. कुणीही ‘मायचा लाल’ शेतकर्‍यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह म्हणाले, शेतकर्‍यांची जमीन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमाने हिसकावली जाईल, असा खोटा प्रचार करण्यात आला आहे. कुणीही मायचा लाल शेतकर्‍यांपासून त्याची जमीण हिसकावू शकत नाही. अशी संपूर्ण व्यवस्था कृषी कायद्यांत करण्यात आली आहे. राजनाथ सिंह हिमाचल प्रदेश सरकारचे तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, काही लोक नव्या कृषी कायद्यांविरोधात जाणून बुजून अफवा पसरवत आहेत. ऐतिहासिक कृषी सुधारणांमुळे त्या लोकांच्या पायाखालची जमीन निसटली आहे. जे लोक शेतकर्‍यांच्या नावावर आपला व्यक्तीगत स्वार्थ साधत होते, त्यांचा धंदा नष्ट होईल, यामुळेच ते देशाच्या एका भागात जाणूनबुजून अफवा पसरवत आहेत, की आमच्या सरकारची एमएसपी व्यवस्था नष्ट करण्याची इच्छा आहे. परंतु किमान आधारभूत किंमत (एमएसपी) नष्ट करण्याचा या सरकारचा हेतू कधीही नव्हता, ना आहे, ना कधी असेल. मंडी व्यवस्थाही कायमच राहणार आहे. आंदोलक शेतकर्‍यांनी 29 डिसेंबरला सरकारसोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला असतानाच राजनाथ सिंहांचे हे वक्तव्य आले आहे. मात्र, या चर्चेसाठी शेतकर्‍यांनी चार अटी ठेवल्या आहेत. यात पहिली अट, तीनही नवे कृषी कायदे मागे घेण्याची आहे. मात्र, सरकारने अनेक वेळा हे स्पष्ट केले आहे, की हे कायदे मागे घेतले जाणार नाही. सरकारने हे नवे कृषी कायदे मोठ्या सुधारणांसह लागू केले आहेत. याचा हेतू शचकर्‍यांना सहकार्य करणे, असा आहे. मात्र, आंदोलक शेतकर्‍यांना शंका आहे, की यामुळे मंडी आणि किमान आधारभूत किंमत (एमएसपी) व्यवस्था नष्ट होईल आणि त्यांना बड्या कॉरपोरेटर्सवर अवलंबून रहावे लागेल. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी किमान आधारभूत किंमत व मंडी नष्ट होणार नसल्याचे सांगितले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply