Breaking News

उरण शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त

उरण : वार्ताहर

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उरण पोलिसांनी शहरात व परिसरात नाका बंदी केली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण गाड्या घेऊन फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. या वेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणार्‍या तसेच कोरोनाचे नियम भंग करणार्‍यांवर पोलीस कारवाई करीत होते. पिरवाड समुद्र किनारा, उरण चारफाटा, उरण शेवा-चार फाटा, दास्तान फाटा, खोपटा व मोक्याच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या पोलीस बंदोबस्तात उरण ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस निरीक्षक, नऊ अधिकारी व 54 कर्मचारी आहेत. तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान कोळीवाडा, उरण मोरा रोड येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तात सहा कर्मचारी एक अधिकार्‍यांचा समावेश होता. या वेळी दोन चाकी, चार चाकी, वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनांचे पेपर (कागद पत्रे), वाहन चालकाचे ड्रायविंग लायसन्स, मास्क, मद्यपी व इतर तपासणी करण्यात आली. कोणताही अनुचित गैरप्रकार घडू नये त्याकडे लक्ष देण्यात आले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply