Breaking News

पनवेल, नवी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 422 जणांवर कारवाई

मद्यपींपेक्षा मोकाट फिरणारे अधिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 422 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात लावलेल्या बंदोबस्तात या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात फक्त 27 जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या उत्साहाला आवर घालण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटोकोर पालन करून घरातच आनंद साजरा करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलिसांनी केल्या होत्या. त्यानंतरही अनेक जण मद्यपान करून वाहन चालवत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी शहर पोलीस व वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाते. त्यानुसार, गुरुवारी संध्याकाळपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आली होती. रस्त्याने जाणार्‍या वाहनांची झडती, तसेच चालकाने मद्यपान केले आहे का, याची चाचणी त्या ठिकाणी घेतली जात होती. या वेळी एकूण 422 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात फक्त  27 चालक मद्यपान करून वाहन चालवताना आढळून आले, तर 270 दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट भटकंती करताना पोलिसांच्या हाती लागले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply