Breaking News

रणधुमाळी ग्रामपंचायत निवडणूकीची

जिल्ह्यात 15 जानेवारीला मतदान तर 18ला मतमोजणी

अलिबाग : जिमाका

एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता एकूण दोन हजार 475 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार 436 अर्ज वैध, 39 अर्ज अवैध तर 848 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून एकूण एक हजार 588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 840 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी सदस्यपदाच्या तीन जागांसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले नाही. माघारीच्या दिनांकानंतर नऊ ग्रामपंचायती बिनविरोध तर सदस्यपदाच्या 225 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता सदस्यपदाच्या एकूण 612 जागांसाठी 299 केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे.

या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान 15 जानेवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply