Breaking News

वरंधा घाटांमध्ये चौदाचाकी टँकर फसला

आठ तास वाहतूक ठप्प

महाड : प्रतिनिधी

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्‍या वरंधा घाट रस्त्यावर माझेरी गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर  चौदाचाकी टँकर फसल्याने या मार्गावरील वाहतूक आठ तास ठप्प झाली होती.

महाड – भोर – पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट गेल्या अनेक वर्षापासून धोक्याचा झाला आहे. मात्र पुणे, भोर, पंढरपुरकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने या मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच संपलेल्या पावसाळ्यामध्ये वरंधा घाटातील एका अवघड वळणावरील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. तरीही काही वाहनचालक या घाटमार्गाने प्रवास करतात़  मंगळवारी रात्री महाड औद्योगीक वसाहतीमधील एका कारखान्याचे केमिकल घेऊन येणारा चौदाचाकी टँकर (एमएच 43-वाय6282) माझेरी गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर अडकल्यामुळे घाटांतील वाहतूक सुमारे आठ तास ठप्प झाली होती. त्यामुळे पुण्याहून आणि महाडकडून येणार्‍या वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अखेर रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला अवजड क्रेन आणि आवश्यक यंत्रणा घटनास्थळी पोहचली. त्यांनी चार तास अथक प्रयत्न करून टँकर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply