नागोठणे : प्रतिनिधी
भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या नागोठणे येथील ओटरमल शेषमल परमार महाविद्यालयात इनोव्हेशन सेल कमिटीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये टिपीओच्या मुख्य निशा जामकर, सिव्हिल विभागाच्या इच्छिता बोरकर तसेच संगणक विभागाच्या प्रणिता जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयाला मिळालेल्या इनोव्हेशन सेलच्या मान्यतेमुळे इंजिनियरींग, जिओग्राफी, फॉर्म सी तसेच पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा व मार्गदर्शन होणार असल्याचे प्राचार्य विपिनकुमार पवार यांनी सांगितले.